Tuesday, 4 January 2011

1/4 Latur News

Latur News
पहिल्या भारतीय छात्र प्रतिनिधी संसद संमेलनाचे आयोजन
January 3, 2011 at 6:25 PM
महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्रालय, मुंबई आणि माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे तर्फे लातूर, दि. 2 : माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे व भारत अस्मिता फांडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले भारतीय छात्र प्रतिनिधी संसद संमेलन दि. 12 जानेवारी ते 14 जानेवारी 2011 दरम्यान माईर्स एमआयटी, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे.
-- Delivered by Feed43 service
विलासरावांना एक क्षण सुद्धा मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही: आ.फडणवीस
January 3, 2011 at 6:25 PM
लातूर, दि. 2 : भ्रष्टाचार, नैतिकतेच्या सीमारेषा ओलांडल्या असताना व शेतकऱ्यांचे सरकार म्हणत असताना खाजगी सावकारास वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विलासरावांना एक क्षण सुद्धा मंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे मत आ. देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय विश्रामगृहावरील पत्रकार परिषदेत व्यक्त केले. त्यावेळा महाराष्ट्र भाजप युवा मोर्चा अध्यक्ष संभाजीराव पाटील, माजी खा.
-- Delivered by Feed43 service
संस्थाचा कारभार सुधारण्यामध्ये सीएची भूमिका महत्वाची : ना. देशमुख
January 3, 2011 at 6:25 PM
लातूर, दि. 2 : केणत्याही संस्थेचे जेंव्हा लेखापरिक्षण केले जाते तेंव्हा संस्थेने चार्टड अंकाऊटंला (सीए) हवी ती माहिती देऊन योग्य असे लेखापरिक्षण करुन घ्यावे. तसेच संस्थेच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी लेखा परिक्षणाचा अहवाल संस्था चालकांनी गांभिर्याने घ्यावा. संस्थांनी संस्थांचा कारभार सुधारण्यामध्ये सीएची भूमिका महत्वाची असते, हे ओळखावे, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री विलासराव देशमुख यांनी आज येथे केले.
-- Delivered by Feed43 service
ते दहा लाख विलासरावांनी भरावेत : शेट्टी
January 3, 2011 at 6:25 PM
लातूर, दि. 2 : सुप्रीम कोर्टाने सानंदा प्रकरणात दहा लाख रुपयांचा दंड सुनावला तो विलासरावांनी भरावा, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी शासकीय विश्रामगृहावरील पत्रकार परिषदेत व्यक्त केले. त्यावेळा सत्तार पटेल, कुलकर्णी, राजेंद्र मोरे, पाटील हे होते. मी आंदोलन करताना एक लक्षात घेतो की शेतकऱ्यांचा फायदा नाही झाला तरी चालेल पण नुकसान होणार नाही जही आमची भूमीका आहे. संघटना बांधणी, चर्चा व त्यातून आंदोलन होत असते.
-- Delivered by Feed43 service
बाबा आमटेंनी अपंगाना स्वावलंबी जगण्याची उर्मि निर्माण केली - ना. विलासराव देशमुख
January 3, 2011 at 6:25 PM
आनंदवनला लातूरकरातर्फे 25 लाखाची निधी देणार लातूर, दि. 2 - जेष्ठ कर्मयोगीबाबा आमटे यांनी आनंदवनात प्रचंड मानवतेच काम केल असून ते प्रवाहाच्या विरोधी पोहत गेले त्यांनी अपंगांना स्वावलंबी जगण्याची उर्मि निर्माण करण्याचे काम केले असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांनी करुन आनंदवनला लातूरकरातर्फे 25 लाखाची निधी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मार्केट यार्डातील कै. दगडोजीराव देशमुख सभागृहात माध्यम संघटनेच्या वतीने डॉ.
-- Delivered by Feed43 service
ना. विलासराव देशमुख यांच्याकडून अर्कशाळेची पाहणी
January 3, 2011 at 6:25 PM
विलासनगर, दि. 2 - मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात उभारण्यात आलेल्या नवीन अर्कशाळा प्रकल्पाची पाहणी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री ना. विलासराव देशमुख यांनी केली असून लवकरच या प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. अर्कशाळा पाहणी प्रसंगी आ. वैजनाथ शिंदे, कारखान्याचे चेअरमन धनंजय देशमुख, व्हा. चेअरमन जगदीश बावणे, कार्यकारी संचालक अशोकराव गिरवलकर व संचालक मंडळ तसेच राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष ऍड. त्र्यंबकदास झंवर, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष ऍड.
-- Delivered by Feed43 service
... तर भारत जगावर राज्य करेल : आ. देवेंद्र फडणविस
January 3, 2011 at 6:25 PM
लातूर, दि. 2 - सन 2020 साली जग वार्धक्याकडे गेलेले असेल त्यावेळी भारत जगताला तरुण देश म्हणून गणला जाईल आणि त्यावेळी भारताकडे 70 टक्के युवक कमवू शकणारी असतील. जगाला मॅन पॉवर पुरविण्याची ताकत भारतात राहील. या युवकांना शिक्षण, प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करुन दिल्यास भारत जगावर राज्य करेल असे प्रतिपादन आ. देवेंद्र फडणविस यांनी केले.
-- Delivered by Feed43 service
रेणाचा 1,00111 साखर पोत्याचे पूजन
January 3, 2011 at 6:25 PM
दिलीपनगर, निवाडा, दि. 2 - रेणा कारखान्याच्या 1,00,111 क्विं. साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन यशवंतराव गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. रेणा कारखान्याचा 2010-11 हा सातवा गळीत हंगाम दिनांक 23 नोव्हेंबर 2010 रोजी सुरु झाला असून गाळप क्षमता प्रतिदिन 1250 मे. टन असताना हंगामाचे सुरवातीपासून जवळपास 200 टक्के कायर्र्क्षमतेचा वापर करुन 39 दिवसात 94000 मे.टन गाळप करुन उच्चांक प्रस्थापित केलेला असून सरासरी साखर उतारा 10.
-- Delivered by Feed43 service
"लातूर फेस्टिव्हल' सर्वांनी सहभागी व्हावे : धीरज देशमुख
January 3, 2011 at 6:25 PM
लातूर, दि. 2 - दिनांक 10, 11 व 12 जानेवारी रोजी आयोजित "लातूर फेस्टिव्हल' मध्ये सर्व वयोगटातील रसिकांनी सहभागी होवून हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन दि लातूर क्लबचे संचालक धीरज देशमुख यांनी केले आहे. "लातूर फेस्टिव्हल' नियोजनाच्या पार्श्र्वभूमीवर घेण्यात आलेल्या विविध समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर ऍड.
-- Delivered by Feed43 service
निमा राज्य उपाध्यक्ष डॉ. संजय जोशी
January 3, 2011 at 6:25 PM
लातूर, दि. 1 - यवतमाळ येथे नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) महाराष्ट्र राज्य शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. तसेच सन 2011 वर्षासाठी निमाच्या राज्य कार्यकारिणीची निवडणुकीद्वारे निवडही करण्यात आली. त्यामध्ये लातूर निमा शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. संजय जोशी हे उपाध्यक्षपदी बहुमताने निवडून आले. त्यावेळी त्यांच्यासोबत लातूर निमाचे अध्यक्ष डॉ. राधेश्याम कुलकर्णी, सचिव डॉ. माधव किरवले, डॉ. दयानंद मोटेगावकर, डॉ. शांतीलाल शर्मा, डॉ.सौ.




No comments:

Post a Comment